नागठाणे, (प्रतिनिधी) – कूपर उद्योग समूहाच्यावतीने नागठाणे, ता. सातारा येथे सुसज्ज स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते झाले.
या अभ्यासिकेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. 600 पेक्षा अधिक मार्गदर्शक पुस्तके, स्पर्धा परीक्षा मासिके, वृतपत्रे, गेस्ट लेक्चर आदी व्यवस्था करण्यात आली आहे. नितीन देशपांडे यांनी कूपर उद्योग समूहाची 100 वर्षांची सामाजिक दायित्वाची परंपरा आणि फरोख कूपर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या समाजाभिमुख उपक्रमांबाबत माहिती दिली. या अभ्यासिकेमुळे नागठाणे पंचक्रोशीतील युवक-युवती अधिकारीपदांवर पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरपंच डॉ. सौ. रूपाली बेंद्रे यांनी कूपर उद्योग समूहाला धन्यवाद दिले. यावेळी उपसरपंच अनिल साळुंखे, आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजित जाधव, जय हिंद अॅकॅडमीचे जाधव, अजित साळुंखे, संजय साळुंखे, कूपर उद्योग समूहाचे सचिन खटावकर,
महेश खरे, दिगंबर सांडगे, सुनील इंगवले, सागर साळुंखे, अनिकेत देशमुख, अजय नलवडे, अभिषेक साळुंखे, प्रशांत साळुंखे, मच्छिंद्र चव्हाण, महेश चक्के, अधिक नावडकर, किरण जाधव, दत्तात्रय जाधव, संदीप बागल, निवास बागल, किशोर बागल, शंकर नावडकर, संदिप जाधव, अनिल कांबळे, अखिलेश गोरे, महेश धुमाळ, संदीप ह. बागल, नितीन धुमाळ, सचिन धुमाळ, मच्छिंद्रनाथ जाधव, अविनाश राठोड, रोहन साळुंखे, प्रथमेश साळुंखे, तेजस बागल, सुजीत साळुंखे उपस्थित होते.