जोहान्सबर्ग : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामदू इसोफू यांनी संयुक्तरित्या काल उद्घाटन केले.
हे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचे प्रतिक आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आले. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारताने आफ्रिकेमधे सुरु केलेलं अशाप्रकारचे पहिलच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. या केंद्रात दोन हजार लोकांच्या क्षमतेचे प्रशस्त असे सभागृह, ग्रंथालय आहे.