मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट अभिनयासह नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते.अलियाने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र अनेकदा तिला काही कारणामुळे तिच्यावर टीकाही केली जाते. आता पुन्हा एकदा आलिया ट्रोलर्सच्या निशाणावर आली आहे. एका बॅगमुळे आलियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आलियानं मेट गालाच्या इव्हेंटवर रँप वॉक केला होता. या सोहळ्यासाठी ब्लॅक कटआऊट शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तिच्या लुकची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आलियाने एक पर्स देखील घेतली होती जी पारदर्शी होते. ही पर्स जॅकी 1961 ब्रँडची होती. त्यामध्ये आलियाने काहीच ठेवले नव्हते. यावरून आता नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
यावरून एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तुझ्या पर्समध्ये काहीच कसे नाही?’, दूसरा नेटकरी म्हणाला, ‘काय आलिया तुझ्या पर्समध्ये तर काहीच नाही’, अशा कमेन्ट करत नेटकरी आलियाची फिरकी घेत आहे. यावर आलियाने देखील ‘हो रिकामी पर्स आहे’, अशी पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट शेवटची संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ मध्ये दिसली होती आणि तिच्या दमदार अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते. आता ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.