नवी दिल्ली – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारमधील वरिष्ठांनी घेतल्याचे समजते. यानुसार किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. रिजिजू यांच्याकडे आता भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोदी सरकारने अचानकपने केलेल्या या मंत्रिमंडळातीळ बदलामुळे अनेक मंत्र्यांचे धाबे दणाणले आहे. अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे केंद्रीय कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. यासोबतच ते संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनही काम पाहणार आहेत. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाचे सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. किरेन रिजीजू यांनी वारंवार कॉलेजियमला विरोध केला होता. यामुळे कायदा मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु असलयाचे देखील सर्वांनी पाहिले. यासह रिजीजू आणि त्यांनी केलेली विधाने नेहमीच वादग्रस्त ठरली होती.