नागपूर – विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. यावरून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी स्थगितीच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं. “तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.