तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाची माहिती व प्रसार करण्याच्या हेतूने सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रॅलीमध्ये मंजू फडके, उपमुख्याधिकारी ममता राठोड, गीतांजली होणमने, सिद्धेश गायकवाड, सुरेश शेंडे, किरण ओसवाल, भगवान शिंदे, दीपक फलले, निलेश भोसले, संतोष परदेशी, रितेश फाकटकर, प्रशांत ताये, प्रदीप मुंगसे, प्रदीप टेकावडे, हर्षद जव्हेरी, रोशनी ओसवाल, राकेश गरुड, मनोज नायडू, निखिल महापत्रा आदी उपस्थित होते.
या रॅलीमध्ये १२५३ विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग नोंदवून माझी वसुंधरा संवर्धनासाठी शपथ घेतली. सायकल सजावट स्पर्धेमध्ये लावण्या शेलार, तनुश फल्ले, आरोही ताये यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. तसेच लकी ड्रॉ मध्ये कौस्तुभ बोरकर, नील दिघे आणि श्लोक संतोष शेंडगे यांची नावे आली.