कर्नाटकमध्ये 4-5 दिवसांत भाजप सरकार स्थापन करणार

येडियुरप्पा यांचा दावा

बंगळूर -कर्नाटकमध्ये राजकीय अनिश्‍चितता कायम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या राज्यात भाजप 4-5 दिवसांत सरकार स्थापन करेल, असा दावा त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना आघाडी सरकार वाचवण्यात अपयश येईल. ते मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाहीत. त्याची जाणीव त्यांनाही आहे. त्यामुळे विधानसभेत चांगले भाषण करून ते पदावरून पायउतार होतील, असे वाटते.

कर्नाटकमध्ये पुढील काही दिवसांत भाजपचे सरकार सत्तेवर येईल असा विश्‍वास मला वाटतो. भाजप चांगले प्रशासन देईल, असे येडियुरप्पा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे सत्तारूढ आघाडीच्या काही आमदारांनी केलेल्या बंडामुळे कुमारस्वामी यांचे सरकार विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याच्या दिवशी कोसळेल, असे भाजपला वाटत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.