नवी दिल्ली – देशातील करोना महासाथीमुळे अनेक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याने लवकरच सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
अशातच आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या JEE-Advanced या प्रवेशपरीक्षेची तारीख जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा करताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, या परीक्षा ३ जुलैरोजी घेण्यात येतील असं स्पष्ट केलं.
“JEE-Advanced प्रवेशपरीक्षा IIT Kharagpur मार्फत ३ जुलैरोजी घेण्यात येईल. गतवर्षी करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना इयत्ता १२वी मध्ये कमीत कमी ७५ टक्के गुण मिळवण्याबाबतची अट शिथिल करण्यात आली होती. यावर्षीच्या प्रवेशांसाठीही अशीच सूट देण्यात येत आहे.” असंही निशंक यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यापूर्वी जेईई ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे व इयत्ता १२ वी मध्ये किमान ७५ टक्के गुण असणे आवश्यक होते. मात्र करोना महासाथ आल्यामुळे ७५ टक्के गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.
#JEEAdvanced 2021 will be conducted on 3rd July 2021. The exam will be conducted by IIT Kharagpur: Minister of Education Ramesh Pokhriyal Nishank pic.twitter.com/ifsmGj9PEL
— ANI (@ANI) January 7, 2021