पुणे : 8 मार्च जागतिक महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक यांच्या वतीने पुणे शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच 25 महिला शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस शिक्षणतज्ञ डाॅ.उमेश प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रा. संतोष थोरात व डॉ. संदीप गाडेकर लिखित TOTAL ENGLISH GRAMMAR & COMPOSITION व ENGLISH GRAMMAR FOR ALL COMPETITIVE EXAMS या दोन इंग्रजी व्याकरणाच्या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्रीपाल सबनीस बोलत होते. टी डीएफ संघटनेने राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन अतिशय महत्त्वाचे कार्य केले आहे तसेच टीडीएफ शिक्षकांसाठी मोलाची कामगिरी बजावत असून महिलांचा गौरव केल्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले की सदर पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा मोठा लाभ होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी डॉ. उमेश प्रधान यांनी पुस्तकांची ची वैशिष्ट्ये व उपयुक्तता तसेच समाजामध्ये भाषा अभ्यासाची गरज याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच इंग्रजी व्याकरणा सारखा किचकट विषय साध्या, व सोप्या भाषेत मांडल्या बद्दल दोन्ही लेखकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र राज्य टीडीएफ चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात यांनी शिक्षक व शिक्षण क्षेत्र वाचवायचे असेल तर संघटनेचे आमदारांना निवडून देण्यासाठी किंवा संघटनेचा प्रतिनिधी आमदार असावा त्यासाठी महिलांनी संघटनेमध्ये येणे काळाची गरज आहे. त्याच प्रमाणे भविष्यामध्ये संघटना बळकट करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी पुणे जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष के.स. ढोमसे तसेच माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा दिल्या.
डॉ. मेघा उपलाने, विभाग प्रमुख शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ, डॉ. किरण तावरे शैक्षणिक कार्याबद्दल, सविताताई बरकडे सामाजिक कार्य, शैलजा शिंदे पोलीस खाते, शिल्पा चाबुकस्वार क्रीडा या क्षेत्रातील महिलांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच सौ.सोनाली थोरात जि. प.प्राथ.शाळा धुमाळमळा यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच वर्षा गाडेकर यांना राजमाता जिजाऊ- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारार्थी यांच्या वतीने आभार व्यक्त करताना डॉ. मेघा उपलाने यांनी पुरस्कार देण्याविषयी व घेण्याविषयीची भावना व्यक्त केली तसेच टीडीएफ करत असलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन व आमची निवड केल्याबद्दल संघटनेचे आभार मानले, तसेच किरण तावरे यांनी या कार्याचा गौरव करून आभार व्यक्त केले याबरोबरच पुणे शहरातील विविध शाळांमध्ये अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या 25 महिला शिक्षकांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन दुर्गाडे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी राज्य टीडीएफ चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, कार्याध्यक्ष प्राचार्य अविनाश ताकवले, महिला गृह उद्योग लिज्जत पापड चे संचालक सुरेशराव कोते, शिवशक्ती प्रतिष्ठान चे बरकडे, जुन्नर तालुका अध्यक्ष पंकज घोलप एकश सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर माध्यमिक शिक्षक पुणे शहर पीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक धालगडे, राज मुजावर, सुनील गिरमे, संजय गीते, संतराम इंदुरे, प्रशांत आबने, आनंद भिकुले स्वाती लीमन, बाबुराव दोडके,दिपक खैरे डाॅ.उज्वला हातागळे, विद्याताई पवार, सुरेश शेंडकर,बाबुराव दोडके तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.