रताळी, बटाटा, भूईमूग शेंगांची आवक

  • मोशी उपबाजार : नवरात्रोत्सवानिमित्त फळांच्या भावात किरकोळ वाढ

पिंपरी – नवरात्रोत्सवानिमित्त रताळे, बटाटा, भुईमूग शेंगांची मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात मोठी आवक झाली. तर पालेभाज्यांमध्ये राजगिऱ्याची आवक सुरू झाली आहे. रविवारी (दि. 18) राजगिऱ्याच्या 8600 जुड्यांची आवक झाली. याशिवाय फळांचीदेखील आवक वाढली असून, भावात किरकोळ वाढ झाली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त बटाट्याची 603 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 357 क्विंटलने आवक वाढली असून, क्विंटलमागे भावात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. रताळ्याची 100 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 94 क्विंटलची आवक वाढली आहे; तर भावात 250 रुपयांची घट झाली. भुईमूग शेंगांची दोन क्विंटल आवक झाली.

क्विंटलचा सरासरी भाव 4 हजार रुपयांवर स्थिरावला. याशिवाय मिरचीची आवक चार क्विंटलने वाढून भाव 500 रुपयांनी वधारले. तर काकडीची आवक 117 क्विंटलने घटून, भावात 850 रुपयांची घट झाली. डांगरची सात क्विंटल आवक घटून भाव 500 रुपयांनी घटले. मटारची दोन क्विंटल आवक घटून भावात 3 हजार रुपयांची घट झाली. लिंबाची 35 क्विंटल आवक झाली.

कांद्याची एकूण 247 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 136 क्विंटल आवक वाढली असून, भाव 1750 रुपयांनी वधारला. गवारीची 10 क्विंटल आवक घटून भाव 750 रुपयांनी घटले. दुधी भोपळ्याची आवक 45 क्विंटलने घटून भाव 250 रुपयांनी वधारले. तोंडल्यांची चार क्विंटल आवक घटून भावात 750 रुपयांची घट झाली.

पालेभाज्यांमध्ये राजगिऱ्याच्या 8 हजार 600 जुड्ड्यांची आवक झाली. तर कोथिंबीर 14 हजार 700 जुड्ड्या, मेथी 2 हजार 50 जुड्ड्या, शेपू 2 हजार 800 जुड्ड्या, पुदीना 1 हजार 200 जुड्ड्या आवक झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.