पिंपरी -एअर लाईन्सच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून तरुणाची तब्बल 1 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रदीप रावसाहेब पंडित (वय-20 रा.थेरगाव) याने फिर्याद दिली आहे. 93194 36356, 79798 12815 या मोबाईल क्रमांकावरुन पायल सिंग व कृष्णा ठाकूर या नावांनी फोन करुन कोटक महिंद्राच्या योगेश चव्हाण यांच्या बॅंक खात्याचा वापर करत फसवणूक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एअर लाईन्सच्या हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून आरोपी यांनी पंडित यांना विविध कारणे सांगत कोटक महिंद्रा व कॅनरा या बॅंकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींनी पंडित यांच्याकडून 3 डिसेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान 1 लाख 14 हजार 100 रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे समजताच पंडित यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.