IMP NEWS : करोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या या 6 गोष्टी…

  1. तुम्ही तरूण आणि स्वस्थ असाल तर कोणताही विचार न करता लस घ्यावी. मात्र तुमचे वय 45 पेक्षा जास्त असेल आणि मधुमेह, किडनी संबंधिची व्याधी असेल किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर अगोदर आपल्या डॉक्‍टरांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घ्यावा. एखाद्याला हिमोफिलीया असेल तर त्यांनी डॉक्‍टरांच्या देखरेखीखालीच लस घ्यावी.

  2. डॉक्‍टरांचा सल्ला घेताना तुम्ही जर सध्या कोणत्या गोळ्या अथवा औषधे घेत असाल तर त्याबाबतही सल्ला घ्यावा. कारण काही लस घेताना काही औषधांच्या बाबतीत रिऍक्‍शन होण्याची शक्‍यता असते. शिवाय ज्यांना काही खाल्ल्यांनंतर अथवा कोणते औषध घेतल्यानंतर ऍलर्जी होत असेल तर त्यांनी अगोदर डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

  3. लस घेणे आवश्‍यकच आहे. पण तुम्ही सध्या कोणत्या गोळ्या घेत असाल तर त्यांच्या सेवनाच्या संदर्भातही अगोदर डॉक्‍टरांशी बोलणी करावी.

  4. तुम्ही लस घेतली असेल तर काही काळा आरोग्य सेवकांच्या देखरेखीखाली राहावे. तुम्हाला कोणते साइड इफेक्‍टस जाणवत नाहीत यावर त्यांचे लक्ष राहील तसेच कशाची ऍलर्जी नाहीये ना, याची माहितीही लगेचच समजेल.

  5. एखाद्या ऍलर्जिक रिऍक्‍शनमुळे अस्वस्थ वाटत असेल, तर थकवा, ताप आणि खाज आदी लक्षणे दिसत असतील तर घाबरू नये. लस दिल्यानंतर इम्यु सिस्टिम अशीच रिऍक्‍ट होत असते. त्यात वेगळे काही नाही.

  6. लस घेतल्यानंतरही मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्स राखणे आवश्‍यक आहे. दिवसात वारंवार हात धुवावे, तसेच ज्या पृष्ठभागांशी संपर्क येतो तेही स्वच्छ ठेवावेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.