“देशालाच मोदींचे नाव देण्याचा दिवस दूर नाही”

कोलकता  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका स्टेडियमला त्यांचे नाव दिले. त्यांनी स्वत:चे छायाचित्र करोना लसीकरण प्रमाणपत्रांवर छापले. आता देशालाच मोदींचे नाव देण्याचा दिवस दूर नाही, असे टीकास्त्र पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सोडले.

बंगालमध्ये महिलांना सुरक्षित वाटत नाही, असे वक्तव्य नुकतेच मोदींनी तेथील एका सभेत केले. त्याचा समाचार ममतांनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सभेत घेतला. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपशासित राज्यांकडे अधिक लक्ष द्यावे. प्रसारमाध्यमांच्या एका वृत्तानुसार गुजरातमध्ये दररोज बलात्काराच्या चार आणि खुनाच्या दोन घटना घडतात.

भाजपचे नेते केवळ निवडणुकांवेळी बंगालमध्ये येतील आणि अफवा पसरवतील. त्यांनी आम्हाला महिला सुरक्षेबाबत व्याख्याने देऊ नयेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी बंगालमधील मतदार सर्व 294 विधानसभा मतदारसंघांमध्ये माझ्याविरूद्ध भाजप अशी लढत अनुवतील. मात्र, काही झाले तरी तृणमूल कॉंग्रेस सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.