Actress Poonam Pandey is alive : अभिनेत्री पूनम पांडे जिवंत आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंय, २ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि सर्वांना तिच्या निधनाची माहिती दिली.
मात्र आता खुद्द पूनम पांडेने पुढे येऊन ती जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. पूनमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
२ फेब्रुवारीला म्हणजे कालपासून पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी पूनमच्या मृत्यूची ही बातमी खोटी असल्याचे मानले. पण स्टार्स ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते, त्यावर हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला. पण पूनमनेच तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती.
पूनमच्या टीमने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. तिच्या मृत्यूच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना, पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत पूनमने काल केलेल्या पोस्ट मागचं कारण आज व्हिडिओच्या माध्यमांतून सांगितले आहे.
या विडिओ पूनम म्हणते की, ‘मी जिवंत मरेन, मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरणार नाही. पण खेदाची गोष्ट म्हणजे या आजाराचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे या आजारामुळे हजारो महिलांचा जीव घेतला आहे. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य गोष्ट HPV लस आणि लवकर तपासण्यांमध्ये आहे. या आजाराने कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे.
पूनम पुढे म्हणाली की, ‘चला गंभीर जागरूकतेने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला कोणती पावले उचलायची याची जाणीव करून देऊया तसेच खात्री करूया. काय केले जाऊ शकते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. चला या रोगाचा विनाशकारी प्रभाव संपवण्याचा प्रयत्न करूया.’ असेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.