मुंबई : देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उमेदवार असण्यावरुन राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आता राष्ट्रपती पदावरून संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रपती हवे असतील तर पवार आहेत. रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक लोक रांगेत आहेत’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले , शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. सर्वात अनुभवी नेते आहेत . अशा प्रकारच्या निवडणुका आल्या की आम्ही त्यांचे मार्गदशन घेतो. देशाला आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारने राष्ट्रपती निवडावा , रबर स्टॅम्प निवडू नयेत. पवार अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नावावर सर्वसंमती होऊ शकते. सरकारच मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील नाहीतर खुजे लोक निवडतील. अशासाठी सरकारचे मन मोठे असावे लागते. राष्ट्रपती हवे असतील तर पवार आहेत. रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक लोक रांगेत आहेत’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
उद्या महत्वाची बैठक
पुढे बोलताना ते म्हणाले उद्या दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी एका महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पवारही येणार आहेत. आम्हालाही निमंत्रण असून आमचा प्रमुख नेता जाणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाची रणनीती ठरणार आहे. पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असावेत असं आम्हाला वाटतं. पण पवारांनी या गोष्टींना मान्यता दिली पाहिजे. तरच पावलं पुढे पडू शकतात, असं ते म्हणाले.
काय आहे पवारांची भूमिका ?
मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असे स्पष्ट केले आहे. याविषयी बोलताना त्यांनी “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असे म्हटले आहे.