बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान ( saif ali khan )याने आपल्या “मानवीय रावण’या वक्त्यव्यावर ट्रोल झाल्यानंतर माफी मागितली आहे. मात्र आता सैफवर अभिनेते मुकेश खन्ना ( mukesh khanna ) यांनी संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
सैफ अली खानचा भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठे करण्याचा प्रयत्न
मुकेश खन्ना ( mukesh khanna ) म्हणाले, ‘सैफ अली खानने एका मुलाखतीमध्ये त्याला रावणाची भूमिका साकारताना आनंद होत आहे. आम्ही रावणाची मानवीय बाजू मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत असे म्हटले होते. यावर मी इतकच बोलू इच्छीतो की जे चांगले आहेत त्यांना चांगले राहु द्या, जे वाईट आहेत त्यांना वाईट राहु द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीही बदल करु नका. हिंमत असेल तर दुसऱ्या धर्माबद्दल असे करुन दाखव? आता सैफ माफी मागतोय. बाण सोडा, बॉम्ब फोडो आणि मग सॉरी म्हणा. पण आम्हाला तुझे सॉरी स्विकार नाही. बोलण्याआधी विचार का नाही केलास?’ असे मुकेश खन्ना हे व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, सैफ दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण देताना म्हणाला, “एका मुलाखतीदरम्यान मी केलेल्या एका विधानाने वाद आणि लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. माझा हेतू तसा नव्हता किंवा मी मुद्दाम काही बोललो नाही. तरी मी आपल्या सर्वांची माफी मागत असून मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान राम माझ्यासाठी नेहमीच नीतिमत्त्वाचे आणि पराक्रमाचे प्रतीक राहिले आहेत. “आदिपुरुष’ हे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळविलेला विजय आहे, असे त्याने स्पष्ट केले.