आपले जवानच सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित राहणार?- धनंजय मुंडे

गडचिरोली: गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पाटोदाचे सुपूत्र शहीद वीरजवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडेंनी आज भेट दिली. मुंडे म्हणाले, छोट्या मोहम्मदने आपले अब्बू गमावले, त्याच्या अश्रूंनी मन गहिवरले. तौसिफच्या कुटुंबियांनी या दु:खातून सावरावे, त्यांचे मनोबल वाढावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

धनंजय मुंडे समोर म्हणाले, हल्ल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे जबाबदार आहेत, त्यांनी योग्य खबरदारी घेतली नाही असा आरोप आहे. पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जब्बार पठाण यांनी कुटुंबियांच्यावतीने काळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले. याची चौकशी व्हावी, कुटुंबियांना न्याय मिळावा.

महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात झालेला भ्याड हल्ला राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. आपले जवानच सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित राहणार? नक्षलींचा हिंसाचार, सरकारचा फोलपणा खपवून घेतला जाणार नाही. माझ्या प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार, असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.