सिडनी : ऑस्ट्रोलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे स्थान भक्कम केले आहे. ऑस्ट्रोलियाने १० सामने खेळले असून यापैकी ७ सामन्यात विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रोलियाने एक सामना अनिर्णित राखला असून त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रोलियाने खात्यात सध्या २९६ गुण जमा असून ते दुस-या स्थानी आहेत.
Australia secure the maximum 240 WTC points from the two series wins this summer.#AUSvNZ #AUSvPAK pic.twitter.com/VwALyapLeC
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020
तर भारतीय संघाने ७ सामन्यांत ७ विजयासह ३६० गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. पण, ऑस्ट्रोलियाने ज्या धडाक्याने मालिका जिंकत आहे ते पाहता भारतीय संघाचे अव्वल स्थान धोक्यात येऊ शकते. मागील दोन मालिकेत ऑस्ट्रोलियाने पाकिस्तानविरूध्दची कसोटी मालिका २-० ने तर न्यूझीलंडविरूध्दची कसोटी मालिका ३-० ने जिंकल्या आहेत.