न्युयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामांना मिळालेल्या नोबेलवर प्रश्न उपस्थित केला आहे. नोबेल पुरस्कार देणाऱ्यांनी अन्याय करून मला अद्याप शांततेचे नोबेल पुरस्कार दिले नाही. असे ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. नोबेल पुरस्कार समितीने न्याय केला असता तर मला अनेक गोष्टींसाठी नोबेल मिळू शकले असते. परंतु, असे झाले नाही. बराक ओबामा यांनी 2009 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकली होती आणि अवघ्या 8 महिन्यांनंतर त्यांना शांततेचे नोबेल मिळाले होते. मात्र, त्यांना कोणत्या कारणासाठी नोबेल मिळाला हे समजले नाही? असा सवालही ट्रम्प यांनी केला.