जळगाव – मागील काही दिवसांत आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. निराशा सहन न झाल्याने अनेक युवक जीवन संपविण्याचा चुकीचा मार्ग निवडत आहेत. जळगावमधून अशीच एक घटना समोर आली असून येथे २९ वर्षीय युवकाने स्टेटस ठेवून आत्महत्या केली.
हर्षल प्रेमनाथ महाजन असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हर्षलने दोन स्टेटस ठेवले होते. त्यात तो म्हणाला की, माझ्यामुळं लोकांचे मूड ऑफ झाला, पण मी स्वत: दुनियेतून ऑफ होत आहे. तसेच कुणाला काही चुकंचे बोलले गेले असेल तर माफी मागतो, अशा आशयाचे दोन स्टेटस हर्षलने व्हॉट्स अपवर ठेवले होते.
जळगाव येथील आयोध्या नगर येथे हर्षलने आत्महत्या केली. हर्शल एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वीच हर्षलची पत्नी गायत्री माहिरी गेली होती. तेव्हापासून हर्षल तणावात होता. मंगळवारी रात्री १० वाजता तो कुटुंबीयांसह जेवन करून झोपला होता. मात्र रात्री २ वाजून २२ मिनिटांनी त्याने व्हॉट्स अँपवर स्टेसस ठेवून गळफास घेतला.
‘माझ्यामुळे लोकांचे मूड ऑफ झाले पण मी स्वत: दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले आणि काहींच्या डोक्यात. मित्र परिवार छान लाभला. माझे आई-वडील हे दुनियातील खूप छान देवमाणूस आहेत. पुढचा जन्म त्यांच्या पोटी येवो ही प्रार्थना देवाला करतो आणि मी कोणाला या गोष्टीसाठी जबाबदार समजत नाही’ तसेच ‘कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो. मला माफ करा’ असे दोन स्टेटस हर्शलने मध्यरात्री व्हॉट्सअॅपवर ठेवले होते.
मृत हर्षल याच्या पश्चात पत्नी गायत्री, वडील प्रेमनाथ महाजन, आई छायाबाई, मोठे भाऊ राहुल व वहिनी सुरेखा असा परिवार आहे.