मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील शुक्रवारी यांना आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते. तथापि कोैटुंबिक कारणांमुळे ते आज या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांनी त्यासाठी आधीच ईडीला पत्र पाठवून वेळ देण्याची मागणी केली होती. आयएल ऍन्ड एफएस च्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जबाब देण्यासाठी त्यांना समन्स जारी करण्यात आले होते.
आज आपल्या घरातील जवळच्या लोकांची लग्ने आहेत. त्यामुळे आपल्याला तेथे उपस्थित राहणे गरजेचे आहे त्यामुळे ईडीने आपल्याला दुसरी वेळ द्यावी, आपण त्या चौकशीला सहकार्य करू अशी भूमिका जयंत पाटील यांनी या आधीच घेतली आहे. आपला इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडशी कधीही कोणताही संबंध किंवा आर्थिक व्यवहार नाही.
मी त्यांच्या दारात यापुर्वी कधीही गेलो नाही किंवा मी त्यांच्याकडून कधीही कोणतेही कर्ज घेतलेले नाही असे त्यांनी या आधीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आपल्याला ईडीपुढे हजर राहण्यासाठी दहा दिवसांची मुदत मिळावी असे पत्र त्यांनी त्यांना लिहीले आहे.