आजच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १० वी व १२वीच्या निकालात द ऑर्बिस स्कूल, केशवनगर व मुंढवा च्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश व उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दोन्ही शाळांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी खालील प्रमाणे.
द ऑर्बिस स्कूल, केशवनगर प्रथम आलेले विद्यार्थी :
इयत्ता १०वी – मिहिका रावत – ९७.६०%
इयत्ता १२ वी – अद्वय नितीन तपस्वी – ९६.८०%
द ऑर्बिस स्कूल, मुंढवा प्रथम आलेले विद्यार्थी :
इयत्ता १०वी – चैतन्य तिवारी – ९८.२०%
इयत्ता १२ वी – अदिती रामाणी – ९५.२०%
याप्रसंगी बोलताना द ऑर्बिस स्कूलसच्या संचालक मुख्याध्यापिका गुंजन श्रीवास्तव म्हणाल्या की “आमच्या विद्यार्थ्यांनी CBSE इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत असा उत्कृष्ट निकाल मिळवला हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे आमचे शिक्षक आणि स्वतः विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. त्यांचे आजचे यश एक आशादायक भविष्याची सुरुवात आहे, जिथे ते आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती आणि समाजासाठी मौल्यवान योगदानकर्ते म्हणून चमकत राहतील.”
त्या पुढे म्हणाल्या की “या यशात योगदान देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि शिक्षकांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा अतुलनीय अभिमान आहे आणि त्यांना त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शाळे कडून खूप खूप शुभेच्छा