मालेगाव – ‘मला 3 वर्षांची मुलगी आहे… माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहे… माझी पत्नी माझ्या काळजात आहे, तरी मी तुमच्यासाठी घराबाहेर आहे’ अशी भावनिक पोस्ट मालेगाव पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी हातात पोस्टर घेऊन कोरोना जनजागृती केली. दरम्यान, मालेगाव पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या कोरोना सारख्या महाभयानक विषाणूने संपूर्ण भारतात हैदोस घातला असून, महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा गर्दीमुळे जास्त होतो. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचं आहे. असं वारंवार पोलीस आणि केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे.