मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोपप्रत्यारोपांची जागा शिवराळ टीकांनी घेतली आहे. शिवसेनेकडून भाजप नेत्यांना उद्देशून नको ते शब्द वापरण्यात आले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे थांबविण्याची विनंती केली होती. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.
मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
शिवसेनेकडून सातत्याने भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील देखील संतापले आहेत. त्यातून त्यांनी शिवसेनेला धमकीवजा इशारा देत आपणही तस बोलू शकतो, असं म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी देखील शिवसेनेला इशार देत भाजप पूर्वीची भाजप पक्ष राहिला नसून खूप स्ट्रॉग झाला असल्याचं म्हटलं होतं.