भजन

भजन हा एक पारंपरिक प्रकार आहे. भजनात देवदेवतांची स्तुती केली जाते. हा एक सामूहिक गायन प्रकार आहे. सर्व भागात आणि सर्व भाषांत भजन हा प्रकार आहेच. कदाचित त्याला नावे वेगवेगळी असतील, पण त्यामागची भावभावना मात्र एकच असते.

भजन एक मन मोहवणारा आनंद देणारा आणि नेत्र आणि कान तृप्त करणारा भावभक्ती पुर्ण असा सुंदर प्रकार! यामध्ये गणपती, देवी, दत्त, शंकर,कृष्ण, विठ्ठल, तसेच कुलदेवता… यल्लम्मा तुळजापूरची भवानी माता, कोल्हा पुरची अंबाबाई, रेणूकामाता,सप्तशृंगी माता वगैरे देवदेवतांची भजने खूप तल्लीनतेने आणि भक्ती भावपूर्वक म्हटली जातात यामध्ये भारुड, जोगवा आणि गोंधळ तसेच टिपऱ्या ह्याचाही समावेश असतो. असा हा भरगच्च रंगारंग कार्यक्रम अत्यंत देखणा आणि श्रवणीय असतो. भजनातील वाद्ये पेटी, डफ, मंजिरी, टाळ, घुंगरू आणि तबला. मध्यंतरात एक गजर घेतला जातो याचा उद्देश नामस्मरण तसेच म्हणारालाही ताजेतवाने वाटते पेंगुळणारा भक्तही तरारून सावरून बसतो भजनात रस घेऊ लागतो.

भजन केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. भजनामधील शब्द, अर्थ, विचार, संगीत-स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ मृदुंग इत्यादीचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. भजन करायचे असेल तर भजनाला संगीत, स्वर, नाद याची साथ आवश्‍यक असते. राष्ट्रसंत भजन करायला सांगतात. भजन कसे करावे, भजनामुळे अंगी सद्‌भाव येतो व भक्तीचा रंग चढतो. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण. नवविधा भक्तीमध्ये कीर्तनरूपी सेवा म्हणजेच भजन होय.

परमेश्वराच्यादिव्यशक्तीचे गुणगान, चिंतन म्हणजेच फभजन. मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धीचा विकास करणे, माणूस आपले दुःख विसरतो..हे फक्त भजनामुळे साध्य होते. भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. परमेश्वराचे नाम घेतल्याने मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. मन जर नामस्मरणाने एकाच ठिकाणी स्थिर झाले तर मनाची शक्ती वाढते. त्या परमेश्वराचे रूप नजरेसमोर उभे राहते व त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात भजनापण प्रसन्न राहातेभजनाने माणूस परमेश्वरासी एकरूप होऊन राहतो. चांगले कर्म आपल्या हातून घडते. आचारही चांगले घडतात.

अनुराधा पवार

Leave A Reply

Your email address will not be published.