हैदराबाद – अनेक डॉक्टर करोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठया प्रमाणात शुल्क आकारतात. काही ठिकाणी तर अक्षरशः डॉक्टरांकडुन रुग्णांची लूट होत असल्याच्या बातम्या समोर आल्यात. मात्र, हैदराबादचे डॉ. व्हिक्टर इम्यानूएल हे गरीब रुग्णांवर केवळ दहा रुपये तपासणी शुल्क आकारून उपचार करतात.
सध्या कोरोनाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले जात असताना या ठिकाणी केवळ दहा रुपयांतच ते गरीब रुग्णांना कोविडवरील उपचाराचा सल्ला देतात. डॉ. व्हिक्टर यांचे क्लिनिक हैदराबादच्या उप्पल डेपोजवळ आहे. डॉ व्हीकटर हे पांढरे रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा कार्ड असलेल्या लोकांनावर केवळ दहा रुपयात तर जवानांवर मोफत उपचार करत आहेत.
Hyderabad doctor treats COVID patients for just Rs 10
Read @ANI Story | https://t.co/uGIEswaBu5 pic.twitter.com/Efl5rXW1dB
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2021
डॉ. व्हिक्टर इम्यानूएल म्हणतात, गरिबांची सेवा करता यावी म्हणून उपचाराचे शुल्क केवळ दहा रुपये ठेवले आहे. समाजातील मागासलेले घटक आणि पांढरे शिधाधारक आणि अन्न सुरक्षा कार्ड असणाऱ्या लोकांसाठी हे शुल्क ठेवण्यात आले आहे.
याशिवाय शेतकरी, ॲसिड हल्ल्याला बळी ठरलेले नागरिक, अनाथ, दिव्यांग, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील माफक दरात सेवा दिली जात आहे. विविध वैद्यकीय चाचण्या, औषधाच्या किमती देखील कमी ठेवल्या आहेत.
डॉ. व्हिक्टर हे मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारावर औषधोपचार करतात. सध्याच्या कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालये आणि दवाखान्याकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. परंतु डॉ. व्हिक्टर हे कोरोनाच्या रुग्णावर केवळ दहा रुपयात उपचार करत असून ते होम आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी मदत करत आहेत. ते दररोज शंभर रुग्णांवर उपचार करतात, मात्र सध्या कोविडमुळे रुग्णांची संख्या वाढली असून दररोज १४० रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या वर्षभरात वीस ते २५ हजार कोरोना रुग्णावर उपचार केल्याचा दावा डॉ. व्हिक्टर केला आहे.