ओक्साका : मेक्सिकोमध्ये ‘अगाथा’ या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे समोर येत आहे. ‘अगाथा’ चक्रीवादळामुळे पूर परिस्थिती आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 20 जण अद्याप बेपत्ता आहेत.
मेक्सिकोमधील दक्षिणेकडील ओक्साका शहराच्या राज्यपालांनी या वादळाची माहिती दिली आहे. ओक्साका राज्याचे राज्यपाल मुरत यांनी, ‘सध्या सुमारे 20 लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतेक डोंगराळ भागातील आहेत.’ मेक्सिकोमध्ये वादळामुळे खूप नुकसान झाले आहे. या वादळामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ओक्साकाचे राज्यपाल अलेजांद्रो मुरत यांनी,”पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक लोक दलदलीच्या आणि खडकांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.
या वादळामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यपाल अलेजांद्रो मुरत यांनी स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे की, ‘पूर आणि भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले बहुतेक लोक डोंगराळ भागातील अनेक लहान-लहान शहरांमधील होते.’
ओक्साका नागरी संरक्षण कार्यालयाने माहिती दिली आहे की, सांता कॅटरिना टेकडीचा काही भाग कोसळल्यानं 18 आणि 21 वर्षे वयोगटातील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. साधारणपणे मे आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान मेक्सिकोला पॅसिफिक आणि अटलांटिक दोन्ही किनारपट्टीवर उष्णकटिबंधीय वादळांचा नियमितपणे फटका बसतो.