बिजिंग :- भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणोय याने गत स्पर्धेतील अपयश मागे टाकत मंगळवारपासून येथे सुरु झालेल्या चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याच्यासह दुहेरी गटात सात्विक साइराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीनेही पहिल्या फेरीतील सामना जिंकत आगेकूच केली.
प्रणोयने या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत तैपेयीच्या चाऊ तीयान चेन याच्यावर 21-18, 22-20 अशी सरळ दोन गेममध्ये मात केली व दुसरी फेरी गाठली.
HS Prannoy knocks OUT former World No. 2 Chou Tien-chen 21-18, 22-20 in opening round of CHina Masters.
Prannoy had lost to the him in 3 out of their last 4 matches. #ChinaMasters2023 pic.twitter.com/Wv07FRe721
— India_AllSports (@India_AllSports) November 21, 2023
पुरुषांच्या दुहेरी गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात सात्विक व चिराग या जोडीने इंग्लंडच्या बेनलेन व सीयॅन वेंडी या जोडीचा 21-13, 21-10 असा पराभव केला व दुसरी फेरी गाठली.
महिला गटातील आव्हान संपले
या स्पर्धेत महिलांच्या एकेरीत केवळ आकर्षी कश्यप हीचाच सहभाग होता. मात्र, तीला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने महिला गटातील भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. आकर्षिला यजमान चीनच्या झॅंग यी मेनकडून 21-12, 21-14 असा केवळ 33 मिनिटात पराभव स्वीकारावा लागला.