बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा आगामी “फायटर’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. यामध्ये हृतिक रोशन हा एका एअरफोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. या चित्रपटाच्या रिलीजसंदर्भाज त्यांना “वायकॉम 18′ स्टुडियो पार्टनरदेखील मिळाला आहे. यासाठी सिद्धार्थ आनंदच्या मार्फिलक्स प्रोडक्शन हाउससोबत मोठी डील करण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या रिलीजशी संबंधित डिजिटल, थिएटर आणि सॅटेलाइटसह सर्व राइट्स “वायकॉम 18’ला मिळाले आहेत. चित्रपट शूटिंग वर्षाअखेर सुरू करण्यात येणार होते. परंतु करोना महामारीमुळे हृतिक रोशनच्या अन्य चित्रपटांचे शूटिंग रखडलेले आहे. यामुळे आता “फायटर’चे शूटिंग पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे बजेट तब्बल 250 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.