इंटरनेट हे असे व्यासपीठ आहे, ज्याचा उपयोग मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत केला जातो. पण अश्लील गटात मोडला जाणारा मजकूर किंवा अडल्ट कन्टेन्ट (छायाचित्र, व्हिडीओ) देखील या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे, ज्यापासून मुलांना दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये असलेल्या सेव्ह सर्च फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना चुकीच्या वेबसाइटपासून दूर ठेवू शकाल आणि मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर तुम्हाला नजरही ठेवता येईल.
० गुगल क्रोमवर उपलब्ध असलेल्या ‘सेव्ह सर्च फीचर’च्या मदतीने तुम्ही मुलांना अश्लील वेबसाइटपासून दूर ठेवू शकता. यासोबतच तुम्ही मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवरही लक्ष ठेवू शकाल. हे फिचर कसे सक्रिय करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू. चला जाणून घेऊया…
१. क्रोम ब्राउझरवर (Crome Browser ) जाऊन गुगल सर्चवर (Google Search) जा.
२. येथे तळाशी तुम्हाला सेटिंगचा (setting) पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. आता तुम्हाला सेव्ह सर्च (Save Search) चा पर्याय मिळेल, फीचर सक्रिय (Inable) करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
४. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुगल सुरक्षित करू शकाल.
० ‘हे’ गुगल ऍप वापरा
गुगल फॅमिली लिंक (Google Family Link) ऍप वापरून तुम्ही मुलांना अश्लील वेबसाइटपासून दूर ठेवू शकता. लॉग-इन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, Google Family Link ऍप तुम्हाला लहान मुलांपासून दूर ठेवणारे ऍप्स मॅनेज करण्यास अनुमती देईल. यामध्ये तुम्हाला स्क्रीन टाइम मर्यादित करण्याची सुविधा देखील मिळेल. याशिवाय मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल.