बीजिंग – जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून गणना होत असलेल्या चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लोकसंख्या नियंत्रणाचे विविध उपाय योजले जात आहेत. तरीही एक हैराण करणारी गोष्ट समोर आली असून चीनमधील एका जोडप्याने वीस वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे पंधरा मुलांना जन्म दिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर या परिसरातील अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.
लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी चीनच्या सरकारने कित्येक वर्षापासून एक मूल हे धोरण राबवले आहे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये हे धोरण बदलून दोन मुलांच्या जन्माला परवानगी देण्यात आली आहे पण ही जी घटना उघडकीस आली आहे ती 1995 ते 2016 सालची आहे तेव्हा चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे कायदे अतिशय कडक होते आणि प्रत्येक जोडप्याला फक्त एकाच मुलाला जन्म देण्याची परवानगी होती असे असतानाही या जोडप्याने वीस वर्षाच्या कालावधीमध्ये तब्बल पंधरा मुलांना जन्म दिला त्यामध्ये अकरा मुली आणि चार मुले यांचा समावेश आहे.
1995 ते 2016 या कालावधीत या जोडप्याने या मुलांना जन्म दिला चीनमधील रोंग कौंटीतील लिगुन शहरात हि घटना घडली असून या मुलांना जन्म दिल्यानंतर ही या जोडप्याने सर्व सरकारी कल्याणकारी योजनांचा फायदा घेतला होता गरीब कुटुंबांना मिळणाऱ्या सर्व आर्थिक सवलतीही या कुटुंबाने मिळवल्या होत्या चीन सरकारने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातील मानवी तस्करीचा शोध घेण्यासाठी एका विशेष मोहिमेचा प्रारंभ केला होता.
या मोहिमेमध्येच माहिती घेत असतानाच ही विचित्र घटना समोर आली चीन प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या परिसरातील सर्व अकरा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे लोकसंख्या नियंत्रणाच्या राष्ट्रीय मोहिमेमध्ये निष्काळजीपणा दाखवण्याचा ठपका या सर्व अधिकार्यांवर ठेवण्यात आला आहे.