मुंबई – उन्हाळ्याची सुरुवात झाली की, मधुर गारवा देणाऱ्या कलिंगडाची लगेच आठवण येते. बाजारात आता कलिंगड दाखल झाले असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली.
उन्हाळ्यात उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असते. कलिंगड हे मुळातच शीत फळ आहे. कलिंगडच्या सेवनाने उन्हामुळे उष्णतेने होणार त्रास कमी होऊन शरीराला शीतलता प्राप्त होते. उन्हामुळे येत असलेला अति घाम कमी होऊन थकवा दूर होतो. तसेच विविध आजारावर उपयुक्त असतो कलिंगड जाणून घ्या फायदे
-मुतखडा असेल तर लघवीतून खडा पडून जाण्यासाठी ताज्या कलिंगडाचा रस रोज काही दिवस घ्यावा. -आम्लपित्त असेल तर पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी देखील कलिंगड खावे.
-उन्हातून आल्यानंतर त्रास होत असेल तर डोक्यावर अर्धवट कापलेल्या कलिंगडाची टोपी घालावी, लगेच आराम मिळतो.
-कलिंगडा मध्ये टोमॅटो प्रमाणेच लायकोपिनच प्रमाण जास्त प्रमाणात असते. लायकोपिन हे -अँटीऑक्सीडेन्ट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला मदत करते.
-कलिंगडाच्या चोथ्यामुळे आणि त्यातल्या आर्द्रतेमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
-उष्माघातामुळे शरीराची आग कमी करण्यासाठी, तळपायाला थंडावा देण्यासाठी त्या भागावर कलिंगडाच्या साली कापून ठेवाव्यात.
-कलिंगडाची साल चेहऱ्यावर घासल्यामुळे चेहरा उजळतो.
जाळी पाहून निवडा कलिंगड
कलिंगडावरील जाळी म्हणजे पॉलिनेशन प्रकियेच्या वेळी मधुमाशांनी किती वेळा स्पर्श केला आहे हे पाहण्याची पद्धत. जेवढी जास्त जाळी मोठी तेवढं जास्त वेळा माशांनी फुलाला स्पर्श केला आहे. त्यामुळे मोठी जाळी म्हणजे कलिंगड जास्त गोड असण्याची खात्री.