नवी दिल्ली – मोबाइल फोन जणू आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे आणि त्याच्या लाभदायी वापरामुळे जास्तीत जास्त सरकारी सेवासुद्धा ऑनलाईन उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळते. त्यात डिजिलॉकरचा समावेश होतो. डिजिलॉकेरेक अशी सुविधा आहे त्यामध्ये आपण आपले आधार कार्ड डिग्री सर्टिफिकेट, इन्शुरन्स सर्टिफिकेट, वेहिकल प्रमाणपत्र सेव्ह करून ठेऊ शकतो.
भारतदेशात सतत कोणत्या ना कोणत्या रूपात मतदान होत असते, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा यासारख्या मतदानात सहभाग नोंदवण्यासाठी नागरिकांनी मतदान ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे असते. हे मतदान ओळखपत्र तुम्ही तुमच्या मोबाइलफोनमध्ये डाउनलोड करून स्टोअर करू शकता. मतदान ओळखपत्र मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपमध्ये कसे डाउनलोड करतात त्याविषयी जाणून घेऊ…
मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर जावे लागेल. https://eci.gov.in/e-epic/ केंद्रीय निवसणूक आयोगाच्या इतर सेवांचा सुद्धा लाभ तुम्हाला या वेबसाईट वरून घेता येईल.
https://eci.gov.in/e-epic/ या वेबसाईटचा, नवीन ओळखपत्र रजिस्ट्रेशन, वोटर आयडीमध्ये पत्ता सुधारणा करण्यासाठी, डिजिटल वोटर आयडी डाउनलोड करण्यासारख्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो. डिजिटल वोटर आयडी कार्डला e-EPIC नावानेसुद्धा ओळखल जाते. आणि ते Pdf फॉरमॅटमध्ये डाउनलोड करून डिजिलॉकरवर सेव्ह करता येणार आहे.
– जर आपण निवडणूक आयोगाच्या वेवेबसाईटला पहिल्यांदा भेट देत असाल तर प्रथम तुम्हाला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून रजिस्ट्रेशन करावे लागेल.
-रजिस्टर झाल्यावर download e-Epic ऑप्शन वर क्लिक करा.
– त्यानंतर आपला EPIC नंबरप्रविष्ट करा. हा नंबर आपल्या वोटर आयडी कार्डवर प्रिंट 10 अंकाचा यूनिक ID असतो.
– डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईलनंबर वोटर आयडीला लिंक असणे गरजेचे आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वोटर आयडी कार्डला फोन नंबर लिंक करण्याचे ऑप्शन आहे.
– आपला फोननंबर वोटर आयडी कार्डला लिंक करण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर (https://www.nvsp.in/) गेल्यानंतर फॉर्म ऑप्शन वर क्लिक करा.
– त्यानंतर फॉर्म 8 वर क्लिक करा आणि सेल्फ अथवा फॅमिली अशा पर्यायांमधील एक पर्याय निवडा.
– आता फॉर्म मधील correction of entries in the existing electoral roll ऑप्शनवर क्लिक करा.
– मोबाईल नंबर प्रविष्ट करा, जो मतदान ओळखपत्राला लिंक करायचा आहे.
– एकदा फोननंबर आणि वोटर आयडी लिंक झाल्यावर आपण https://eci.gov.in/e-epic/ वेबसाइट वर जाऊ शकता.
– त्यानंतर EPIC नंबर प्रविष्ट करा आणि डिटेल वेरिफाई करा.
– आता OTPच्या माध्यमातून फोननंबर वेरिफाई करा आणि download e-EPIC वर क्लिक करून आपल्या स्मार्टफोन, टैबलेट, लैपटॉपमध्ये e-EPIC डाउनलोड करा..
निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरील फॉर्म 8 भरून डुप्लिकेट वोटर आयडी कार्ड मिळवू शकता. तसेच हे कार्ड आपल्या वोटर आयडी कार्ड मध्ये दिलेला पत्त्यावरही पाठवले जाते.