AC Tips : उन्हाळा सुरू झाला आहे. देशातील अनेक भागात उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कुलर, पंखे, एसी बाहेर काढले जात आहेत. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण त्यासाठी वीजही खूप लागते. एक टन एसी किती वीज वापरतो आणि कमी वीज बिलासाठी कोणत्या टिप्स पाळल्या पाहिजेत.
किती वीज वापरली जाते?
साधारणपणे, 1 टन एसी आणि 1.5 टन एसी बाजारात दिसतात. एक टन एसी म्हणजे 1000 वॅट्स आणि 1.5 टन म्हणजे 1500 वॅट्स. म्हणजेच एक टन एसी 1000 वॅट वीज वापरेल हे येथे स्पष्ट आहे. पण आता प्रश्न असा आहे की हा विजेचा वापर किती काळ टिकतो, तर याचे उत्तरही जाणून घेऊया. | AC Tips
एक टन क्षमतेचे दोन एसी वेगवेगळ्या कॅपिसिटी प्रमाणे वीज वापरू शकतात. हे त्यांच्या रेटिंगवर अवलंबून आहे. समजा तुमच्याकडे एक टन वजनाचा एसी आहे ज्याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे, तर ते एका तासात 1000 वॅट्स म्हणजेच 1 युनिट वीज वापरेल. | AC Tips
EER (एनर्जी एफिशिएन्सी रेशो) किंवा ISEER रेटिंग आणि कूलिंग क्षमता AC वर दिलेली आहे. ज्यामुळे विजेचा वापर सहज काढता येतो. जर तुमच्या AC चे EER रेटिंग 0.92 असेल आणि तुमच्या AC ची कूलिंग क्षमता 1000 असेल. तर इथे तुम्हाला एक फॉर्म्युला लागू करावा लागेल. तुम्हाला EER रेटिंगने कूलिंग क्षमतेच भागाकार करवा लागतो.
8 तासाला किती युनिट्स ?
येथे 0.92 ला 1000 ने भागल्यास 1086 मिळते. म्हणजेच तुमचा एसी एका तासात 1086 वॅट वीज वापरेल. दुसरीकडे, 1.5 टन एसी 1500 वॅट पॉवर वापरतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही दिवसाचे आठ तास एसी वापरलात तर तो दररोज १२ युनिट वीज वापरेल. | AC Tips
यानुसार एका तासात सरासरी १.५ युनिट वीज वापर होतो. तुमच्याकडे 10 रुपये प्रति युनिट वीज असेल, तर तुम्हाला एक तास एसी चालवण्यासाठी 15 रुपये खर्च करावे लागतील.