मुंबई – मुंबईमधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या हॉटस्टार अर्थात इरॉटीक क्वीन पूनम पांडेनं तिच्या सोशल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडियोला नेहमीच काही काही तासांत हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळत असतात. हॉट फोटोशूट आणि सेक्सी व्हिडीओजच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत राहणे, हाच पूनमचा आता मुख्य व्यवसाय बनला आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते मात्र आता या चर्चांवर पूर्ण विराम लागला आहे.
View this post on Instagram
कारण पूनमने नववर्षाच्या निमित्ताने आता एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिने हा निर्णय का घेतला आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आता तिने तिचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट डीलिट केले आहे.
पूनमचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण आता तेच अकाऊंट तुम्ही शोधायला गेलात तर तिचे अकाऊंट आपल्याला मिळत नाही. कारण ते तिने डीलिट केले आहे. पूनमच्या या निर्णयांमुळे तिच्या सोशल मीडियावरील फॅन्सला चांगलाच धक्का बसला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आपली वादग्रस्त वक्तव्ये आणि उन्मादक अवस्थेतील छायाचित्रे किंवा व्हिडीओज सोशल मिडीयात शेअर करुन धुमाकूळ घालणारी मॉडेल, अँकर आणि अभिनेत्री पूनम पांडेचा हॉट तिच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत अली आहे.