मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:साठी स्थान निर्माण केले नसेल, परंतु अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत राहते. ऋषभ पंतसोबत तिचे नाव यापूर्वी अनेकदा जोडले गेले आहे. मात्र याकडे दोघांनी नेहमीच दुर्लक्ष केले.
उर्वशीने स्वत:ला इतक्या अप्रतिम पद्धतीने सांभाळले आहे की प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. सुंदर असण्यासोबतच उर्वशीही खूप बोल्डही दिसते. कदाचित इतक्या हुशार आणि सुंदर असण्याचा हा परिणाम असावा की उर्वशीला हा पुरस्कार मिळाला आहे.
तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना या पुरस्काराची माहिती दिली आणि आपला आनंद व्यक्त केला. उर्वशीला वर्ल्ड्स मोस्ट एलिजिबल बॅचलोरेटचा पुरस्कार मिळाल्या नंतर तिने सुंदर फोटो शेअर केली तिच्या पुरस्काराबद्दल माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, ‘वर्ल्ड्स मोस्ट एलिजिबल बॅचलोरेट मी या पुरस्कारासाठी IWMBuzz आणि सर्वांचे मनापासून आभार मानते. मी प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन.’
नुकतीच उर्वशी नव्या बंगल्यात शिफ्ट झाल्याचं बोललं जात आहे. उर्वशी गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती आणि उर्वशी आता जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्याजवळील बंगल्यात शिफ्ट झाली आहे. हा तोच बंगला आहे ज्यात यश चोप्राची पत्नी पामेला चोप्रा मृत्यूपर्यंत राहत होत्या.