आजचे भविष्य (सोमवार, दि.१६ नोव्हेंबर २०२०)

मेष : मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा.

वृषभ : कल्पनेला वास्तवतेची जोड मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील.

मिथुन : पैशाची आवक वाढेल. आखलेले आखाडे बरोबर येतील. नवीन कामे मिळतील.

कर्क : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते याची प्रचिती येईल. मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह : महत्त्वाकांक्षा जागृत होईल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामात फायदा वाढवाल.

कन्या : एकाच वेळी घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष दयावे लागेल. व्यवसायात ग्रहांची मर्जी राहील.

तूळ : महत्त्व ओळखून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. व्यवसायात व्यक्‍तिची योग्य कामासाठी निवड करा.

वृश्‍चिक : रागांवर नियंत्रण ठेवा. प्रकृतीची हेळसांड करू नका. मुलांच्या प्रगतीबाबत निश्‍चिंत व्हाल.

धनु : संमिश्र ग्रहमान राहील. एक चांगली तर एक मनाविरुद्ध घटना घडेल.

मकर : रागलोभाचे प्रसंग येतील, शांत रहा. कर्तव्यपूर्तीला प्राधान्य राहील. घराज सहजीवनाचा आनंद घ्याल.

कुंभ : व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे मिळतील. पैशाची तजवीज होईल.

मीन : ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.