मेष : या सप्ताहात तुम्हाला माणसांची पारख चांगली कळेल. स्वप्न व सत्य यातील फरकही लक्षात येईल.
वृषभ : व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कामात बदल करावा लागेल.
मिथुन : हाती असलेल्या कामांना गती मिळेल. पैशाची तजवीज करुन ठेवावी लागेल. कामाचा झपाटा चांगला राहील.
कर्क : नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. बेकार व्यक्तिंना नोकरीची संधी दृष्टीक्षेपात येईल.
सिंह : घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल.
कन्या : प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. महिलांना छंद जोपासता येईल. शुभकार्येही ठरतील.
तूळ : महत्वाचे ग्रह अनुकूल आहेत तेव्हा फायदा घ्या. कामांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करा.
वृश्चिक : पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. त्यातून नवीन गुंतवणूकीचे विचार मनात येतील.
धनु : नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याची काळजी घ्या. अतिविसंबून राहू नका.
मकर : आपले काम बिनचूक करा. घरात प्रवासाचे बेत ठरतील. मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल.
कुंभ : विनाकारण धावपळ, दगदग पात्र टाळा. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीमान सुधारेल.
मीन : केलेल्या कामाचे समाधान मिळेल. सर्वजण कौतुकही करतील. त्यामुळे कष्टाचे चीज होईल.