मेष : महिलांना अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. कौतुकास पात्र काम हातून घडेल.
वृषभ : आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.
मिथुन : महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. नवीन खरेदी करून गृहसजावट कराल.
कर्क : महिलांनी ‘मौन सर्वार्थ साधनम्’ हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांनी फाजील आत्मविश्वास बाळगू नये.
सिंह : खर्चही वाढेल.कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. तरुणांचे विवाह ठरतील.
कन्या : महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी. अविश्वास न दाखवता कामे इतर व्यक्तिवर सोपवावीत.
तूळ : सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.
वृश्चिक : तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. अतिविश्वास टाळा.
धनु : महिलांना कामात झालेली दिरंगाई सहन होणार नाही. त्यामुळे चिडचिड होईल.
मकर : नोकरीत तुमचे व कामाचे महत्त्व वरिष्ठांना कळून येईल. कौतुकास पात्र काम हातून घडेल.
कुंभ : कामाचे समाधान लाभेल.आवडत्या व्यक्तिच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना पूरक ग्रहमान लाभेल
मीन : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. प्रवास घडेल. बदल घडून येईल. महिलांना छंदात वेळ मजेत जाईल.