जॉन अब्राहम याला पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स (पेटा) द्वारा 2020 मधील “पर्सन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. जॉनने 2020मध्ये ई-रिटेलर “क्विकर’ला विनंती केली होती की, जिवंत जनावरांचा व्यापार बंद करावा.
या वर्षात त्याने पेटा इंडियासोबत पशु सर्कसवर निर्बंध लावणे, मुंबईत माकडांचा नाच करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठविणे आणि एका जाहिरातीच्या माध्यमातून पक्षी पिंजऱ्यात न ठेवण्याबाबत आवाहन केले होते.
जॉन अब्राहमसह राजनेता शशि थरूर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. एस. पणिक्कर राधाकृष्णन, क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, सनी लिओनी, सोनम कपूर, कपिल शर्मा, हेमामालिनी, आर आणि जॅकलीन फर्नांडिस यांनाही गौरविण्यात आले आहे.
पेटा इंडियाचे सेलिब्रिटी आणि पब्लिक रिलेशन्सचे संचालक सचिन बंगेरा म्हणाले, जॉन अब्राहम हा प्रारंभीपासूनच पेटा इंडियाच्या माध्यमातून जनावरांबाबत आवाज उठवित आहे.
जर एखादा पक्षी पिंजऱ्यात पीडित असेल, जनावरांची क्रूरतेने विक्री होत असेल किंवा जगातील एखादी प्रजाती धोक्यात आली असल्यास तिला वाचविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.