पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटन (NSUI) च्या वतीने होळीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी म्होरक्या चित्रपटाच्या टीमसोबत कोरडा रंग खेळून पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा केला.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा देत संवाद साधला, ते म्हणाले, जगात भारत एकमेव असा देश आहे जिथे रंगाला एवढे महत्व दिल्या जाते, रंगाचा उत्सव साजरा केला जातो यामुळे रंग कोणीही वाटून घेऊ नये रंग आपले आहेत, रंगासारखंच आपण आपलं आयुष्य साजरे करावे.
NSUI च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सतीश पवार, अमीर पठाण, मोहिनी जाधव, आकाश दौंडे, अतिक शेख उपस्थित होते,रंगोत्सवाच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
-विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर,
पुणे विद्यापीठ