नवी दिल्ली – भारत सरकारने अमेरिकेसोबत आपले व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता अमेरिकेत उत्पादित करण्यात आलेले डुकराचे मांस आता भारतीय बाजारपेठेत येणार आहे. भारताच्या व्यापारी इतिहासात असा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.
अमेरिकेमध्ये पोर्क अर्थात डुकराच्या मांस मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येते. त्यापासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची मोठी बाजारपेठ अमेरिकेत आहे. आकडेवारीत सांगायचं झाल्यास 2020 मध्ये अमेरिका हा डुकराच्या मांसाच उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. तर निर्यातीच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या वर्षभरात अमेरिकेने पाच लाख 70 हजार कोटी रुपये किमतीच्या डुकराच्या मांसाची निर्यात केली आहे. आता भारतीय बाजारपेठ खुली करून देण्यात आल्याने अमेरिकेची निर्यात वाढणार आहे.
नव्या निर्णयामुळे अमेरिकेतून भारतीय बाजारपेठेत यापूर्वी जी कृषी उत्पादने निर्यात केली जात असत त्यामध्ये डुकराच्या मांसाची व त्यापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांची भर पडणार आहे. हे पदार्थ भारतीय बाजारपेठेत विकण्यास अमेरिकी ला परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.