लखनौ : अखील भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन उर्फ यादव यांच्या हत्ये प्रकरणी लखनौ पोलिसांच्या विशेष पथकाने चार जणांना ताब्यात घेतले. जोरखपूर आणि राय बरेली येथे ही कारवाई केली. रणजीत यादव हे रविवारी मॉर्निंग वॉकला जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
यादव यांच्या मोबाईलच्या कॉलच्या सहाय्याने या संशयिताना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर या पैकी एकाने यादव यांच्या जवळच्या नातेवाईकाला फोन केला असल्याचे तपासात समोर येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. या हत्या प्रकरणात सर्व बाजूंनी विचार करून पोलिस तपास करत आहेत.
या प्रकरणी यादव यांची पत्नीची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोरखपूर येथील एक प्रॉपर्टी डिलरही पोलिसांच्या रडावर आहे. यादव यांच्या डोक्यात मोटार सायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. हजरतगंज येथे ग्लोबल पार्क जवळ ही हत्या करण्यात आली होती. त्यांचे लहान भाऊ आदित्यही त्यांच्या सोबत होते. तेही गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चार पोलिस अधिकारी निलंबित झाले आहेत.