मुंबई : प्रथम दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेत म्हणजेच रणजी करंडक स्पर्धेत मूळचा मुंबईचा मात्र सध्या विदर्भ संघाकडून खेळत असलेल्या अनुभवी वासिम जाफरने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
1⃣2⃣0⃣0⃣0⃣ #RanjiTrophy runs and counting! 👏👏
Wasim Jaffer is that run machine that keeps on scoring. 👌👌
He has surpassed fifty as Vidarbha near 130 against Kerala.
Follow it live 👉👉 https://t.co/B03DEOFUMP
#VIDvKER @paytm pic.twitter.com/ICO7BcvDrA— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 4, 2020
नागपूरमध्ये सुरू असलेल्या केरळविरूध्दच्या रणजी सामन्यात जाफरने रणजी स्पर्धेत १२ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. जाफरचा हा १५० वा रणजी सामना आहे. जाफरने १९९६-९७ साली रणजी स्पर्धेतून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रणजी स्पर्धेत सर्वाधिक ४० शतकांचा विक्रमदेखील जाफरच्या नावावर आहे.
जाफरने भारताकडून ३१ कसोटी सामन्यातून १ हजार ९४४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. जाफरने वेस्टइंडिजविरूध्द २१२ तर पाकिस्तानविरूध्द २०२ धावांची खेळी केली होती. रणजीत खेळत असतानाही वसीमने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.