नवी दिल्ली – विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. कर्णधारपदी असताना धोनीने २०११ साली भारताला विश्वचषक मिळवून दिला होता. यंदाच्या वर्षी चौथा आणि शेवटचा एकदिवसीय विश्वचषक धोनीने खेळाला. परंतु, धोनी निवृत्ती कधी घेणार यासंबंधी कोणालाही कल्पना नाही.
पुढच्या महिन्यातील वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनी संघात सहभागी होणार नसल्याने निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, धोनी सध्यातरी संन्यास घेण्याच्या विचारात नसून सर्वात आधी तो आपले अपूर्ण काम पूर्ण करणार आहे. संघात यष्टीरक्षकची जागा आता रिषभ पंत घेणार आहेत. आणि पंत जोपर्यंत पूर्णतः सेट होत नाही तोपर्यंत धोनी त्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु, दिनेश कार्तिक रिषभ पंतच्या तुलनेत अधिक अनुभवी आहे. यामुळे धोनीची जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
दरम्यान, यशामागे महेंद्रासिंग धोनीचे मोलाचे योगदान असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा देशाचा हिरो आहे. त्याने आपल्याला दबावाच्यावेळी संयमी राहून खेळ करण्याचे शिकवले आहे, असे अनेकदा ऋषभ पंतने सांगितले होते.