“हॅलो, मी बराक ओबामा बोलतोय…”

ओबामा यांचा जो बायडेन यांच्या प्रचारासाठी 'फोन बँकिंग उपक्रम'

वॉशिंग्टन : अमेरिकेतही निवडणुकांचे वारे वाहत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु असल्याचे दिसत आहे.दरम्यान, या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यासाठी ओबामा यांनी बायडेन यांच्या प्रचारासाठी नवा मार्ग स्वीकारला आहे. बराक ओबामा नागरिकांना फोन बँकिंग उपक्रमाद्वारे फोन करुन जो बायडेन यांचा प्रचार करत आहेत.

बराक ओबामा यांनी असाच एक फोन अलिसा नावाच्या महिलेला फोन केला आणि तिच्या सोबत तिच्या आठ महिन्यांच्या बाळासोबतही थोडासा संवाद साधला. माजी राष्ट्राध्यक्षांचा फोन आल्याने अलिसा भारावून गेल्या. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अलिसा हिला फोन करुन जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ओबामांनी अलिसा यांच्या आठ महिन्यांच्या बाळाशी संवाद साधला. ”हे जॅक्स, व्हॉट्स गोईंग ऑन, मॅन” असे त्यांनी विचारलं आणि अल्यास्सा यांना मतदान करण्याचं आवाहन करुन संवाद संपवला. यावेळी त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांनाही मतदान करण्यास सांगावे, असे म्हटले.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या मिनिटापर्यंत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी प्रचार अभियान राबवले. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये लढत होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर प्रचारादरम्यान जोरदार टीकास्त्र सोडले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.