पुणे – रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीने आज विभागीय आयुक्त कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढला.
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून आलेल्या मोफत धान्याचा काळा बाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. पुणे शहर व जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी, शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी, सर्व रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.