पावसामुळे शेती पिकांना फटका

अवसरी परिसरातील शेतात साठले पाणी : शेतकऱ्यांचे नुकसान

अवसरी – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात शनिवारी आणि रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतातील पिकात जमा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, शाळू, वालवड पिकांना फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

शनिवारी (दि. 19) दुपारी तीन वाजल्यापासून अवसरी परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शनिवारी दुपारी सुरू झालेला भिज पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू होता. आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात प्रामुख्याने मंचर, अवसरी खुर्द, तांबडे मळा, भोरवाडी, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी आदींसह अनेक भागात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. मागील दोन दिसव झालेल्या पावासामुळे अनेक रस्त्यावर पाणी साठले होते. तर अनेक ठिकाणी शेती पिकात पाणी साठले आहे. त्यामुळे सगळेच्या दलदल निर्माण झाली आहे.

दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक भागातील रस्त्यावर पाणी साठल्यामुळे मंचर-मुळेवाडी मार्गे अवसरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे रस्त्यावर पाणी जमा झाल्याने खड्डे पडल्याचे दिसून आले.

मतमोजणी केंद्राबाहेर चिखल –
अवसरी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर मुरुम टाकून काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविले होते. परंतु, पावसाने रस्त्यावर चिखल झाल्याने मतदान प्रक्रियासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.