मुंबई – देशात साधारण सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लशीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्य सरकार लसीकरण कार्यक्रमसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. ( corona vaccine update )
राजेश टोपे म्हणाले, देशात आणि राज्यात करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरु आहे. केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल.
तसेच लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ( corona vaccine update )
18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचे मायक्रो प्लानिंग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाचा प्रतिबंध करणारी लस केंद्र सरकार पुरवेल अशी आम्हाला खात्री आहे. जी कामे राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतो आहोत. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामे सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार करण्यात आले आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता निर्णय केंद्राला करायचा आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ( corona vaccine update )