मुंबई – करोनाच्या पार्श्वभीमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. संपूर्ण राज्यातील क्वारंटाईनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कुणालाही सूट नसणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
होम आयसोलेशन रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिटामॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.